आणखी एका भारतीयाला मिळाली मोठी जबाबदारी, कोण आहेत शिवकुमार व्यंकटरमण? Google चा ब्लॉकचेन विभाग हाताळणार

वॉशिंग्टन, 25 जानेवारी 2022: भारतीय वंशाचे सीईओ आणि इतर वरिष्ठ अधिकारी अनेक दिग्गजांमध्ये आहेत. आता या यादीत आणखी एका नव्या नावाची भर पडली आहे. गुगलच्या नवीन ब्लॉकचेन विभागाची जबाबदारी एका भारतीयाला देण्यात आलीय. इंजिनीयर शिवकुमार वेंकटरामन यांची गुगलमधील वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवकुमार वेंकटरामन गुगलच्या ‘ब्लॉकचेन आणि इतर नेक्स्ट-जन कंप्युटिंग आणि डेटा स्टोरेज टेक्नॉलॉजीज’ची जबाबदारी घेतील. ते जवळपास दोन दशके म्हणजे 20 वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. आतापर्यंत ते कंपनीच्या सर्च ॲडव्हर्टायझिंग बिझनेसवर काम करत होते.

यासोबतच शिवकुमार वेंकटरामन यांचंही नाव नुकत्याच नियुक्त झालेल्या चॅनलच्या सीईओ लीना नायर आणि ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्या यादीत सामील झालं आहे. बार्कलेजने सीएस वेंकटकृष्णन यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी त्यांची नियुक्ती झाली होती.

अभियंता शिवकुमार वेंकटरामनचे टॉप बॉस सुंदर पिचाई असतील, जे भारतीय आहेत. सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ आहेत. असं दिसतं की Google चे लक्ष वेब 3 वर आहे, जे ब्लॉकचेनवर कार्य करते. क्रिप्टोकरन्सी आणि NFT देखील या प्रणालीवर कार्य करतात.

शिवकुमार वेंकटरामन हे ५२ वर्षांचे असून ते मूळचे हैदराबादचे आहेत. 1990 मध्ये त्यांनी आयआयटी चेन्नईमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेटसाठी गेले.

वेंकटरामन यांनी आपल्या कारकिर्दीला हेवलेट-पॅकार्ड लॅबोरेटरीजमध्ये समर इंटर्न म्हणून सुरुवात केली. यानंतर त्यांनी आयबीएममध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केलं. 2003 मध्ये, त्यांना Google च्या मुख्य कोर सर्च एडवरटाइजमेंट बिझनेस ची जबाबदारी मिळाली. जानेवारी 2004 मध्ये त्यांना Google Labs चे उपाध्यक्ष बनवण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा