जम्मू काश्मीर, दि. १८ जुलै २०२०: शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली. यावेळी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत ही दुसरी चकमकी आहे. अशाप्रकारे, काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत ६ दहशतवादी ठार झाले आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाला परिसरातील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाविषयी माहिती मिळाली, तेव्हा पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसर घेरला आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलाने जवाबी कारवाई केली आणि तिन्ही दहशतवादी ठार झाले.
याआधी शुक्रवारी कुलगाममधील सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत असताना काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी पाहायला मिळाली.
यापूर्वी गुरुवारी कुपवाडा येथे सैन्याने नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न फसला. या दरम्यान सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी