नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२०: काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात भारतीय हॅकर कडून पाकिस्तानी न्यूज चॅनल हॅक करण्यात आले होते. ज्यात न्यूज चॅनल प्रसारित होत असताना, मध्य भागी तिरंगा फडकताना दिसत होता. तसेच आज भारतीय हॅकर कडून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकिस्तानी वेबसाईट वर निशाणा साधला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवसाआधी हॅकरने पाकिस्तान च्या फातिमा जिन्ना महिला विश्वविद्यालयाच्या वेबसाईटला हॅक केले आहे. तसेच “इंडियन सायबर ट्रुप ” अशा नावाने हैक करत वेबसाईट वर त्यांनी स्वतंत्रता दिवसाचे संदेश लिहत पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच काही वेळातच वेबसाईटला रिस्टोर करण्यात आले.पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने आपल्या ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात विश्वविद्यालयाच्या वेबसाईट वरील काही स्क्रीनशॉट्स आहेत. त्यात इंडियन हॅकर्स द्वारे भारतीय तिरंगा फडकवला गेला आणि खाली भगवान राम यांचा फोटो होता. त्या फोटो खाली त्यांनी “रामलल्ला हम आएंगे, मंदिर कराची और लाहौर में भी बनाएंगे” असे लिहले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे