नवी दिल्ली, 2 जुलै 2022: नुपूर शर्मा यांच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीबाबत देशाच्या सरन्यायाधीशांना एक पत्र याचिका देण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्ते अजय गौतम यांनी दिलेल्या पत्र याचिकेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात केलेली टिप्पणी मागं घेण्याची मागणी करण्यात आलीय.
सामाजिक कार्यकर्ते अजय गौतम यांनी CJI ला दिलेल्या पत्र याचिकेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात केलेली टिप्पणी मागं घेण्याची मागणी केली होती, नीपूर शर्मा यांच्यावर निष्पक्ष खटला चालवावा, असं म्हटलं आहे. याशिवाय अजय गौतमने नुपूर शर्माच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं तिच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे दिल्लीला वर्ग करण्यात यावेत.
पत्र याचिकेत म्हटलं आहे की न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नुपूर शर्मावर ही टिप्पणी केली आहे-
1- उदयपूर हत्याकांडासाठी नुपूर शर्मा जबाबदार आहे.
2- देशात लागलेल्या आगीला त्या जबाबदार आहे.
3- तिने टीव्हीसमोर बिनशर्त माफी मागायला हवी होती.
4- नुपूर शर्माने देशातील एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या.
5- देशात जे काही घडलं त्याला सर्वस्वी नूपुर शर्मा जबाबदार आहे.
6- नुपूर शर्माला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना अपयश आलं.
7- देशभरात घडणाऱ्या घटनांना ती एकटाच जबाबदार आहे.
8- नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळं संपूर्ण देश हादरला आहे.
9- उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला नुपूर जबाबदार आहे.
भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती
नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. अलीकडेच त्यांनी एका टीव्ही चर्चेत प्रेषित मोहम्मद यांच्यावर टीका केली होती. याला मोठा विरोध झाला. कुवेत, यूएई, कतारसह सर्व मुस्लिम देशांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं. मात्र, त्यांनी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. मी माझे शब्द मागे घेते, कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता असंही सांगितलं.
नुपूरवर अनेक राज्यांत गुन्हे दाखल
नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर देशातील अनेक भागात निदर्शने झाली. एवढंच नाही तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी नुपूर शर्मा यांनी सर्व प्रकरणे दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे