पुणे, २२ जुलै २०२० : पुणे महानगरपालिकेतर्फे वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक. ३२ मधील कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटल वारजे येथे अँटीजेन रॅपिड टेस्ट सेंटर सुरु केली आहे. यावेळी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, जेष्ठ नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, डॉ. तारडे, मनपाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
हि चाचणी मोफत असून, या टेस्टमुळे एका तासात कोरोनाचा रिपोर्ट येणार असल्यामुळे नागरिकांमध्ये या टेस्ट सेंटर बाबतीत चर्चा होत आहे. यापूर्वी कोरोनाची टेस्ट करण्यासाठी नागरिकांना सिंहगड रोड आणि एस.एन.डी.टी. कॉलेज येथे जावे लागत होते.
आता वारजे – माळवाडीतील नागरिकांना कोरोना टेस्ट सेंटरमुळे, नेगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या नागरिकांना घरी सोडले जाणार आहे तर, कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह येणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू, असे दीपाली धुमाळ यांनी सांगितले. कोरोना टेस्टचा रिपोर्ट एका तासात मिळणार आहे. हि फार महत्वाची बाब आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी