बॉलीवूड चित्रपटसृष्टी हा “विषारी” उद्योग ; अनुराग कश्यप यांचे मोठे वक्तव्य.

31
Anurag Kashyap Anurag Kashyap news
बॉलीवूड चित्रपटसृष्टी हा "विषारी" उद्योग ; अनुराग कश्यप यांचे मोठे वक्तव्य..

Anurag Kashyap : बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, ज्यांचे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘ब्लॅक फ्रायडे’ सारखे चित्रपट अभूतपूर्व कामगिरी करत आहेत. अशा दिग्दर्शकाने मुंबईला रामराम ठोकला आहे. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबबात माहिती दिली आहे. त्याचबरोबर आजच्या बॉलीवूड स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, बॉलीवूड स्थिती “विषारी” आहे असे त्यांनी वर्णन केले आहे.

द हिंदूच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने म्हंटले आहे की, ” मला चित्रपटसृष्टीतील लोकांपासून दूर राहायचे आहे. हा उद्योग खूपच विषारी झाला असून प्रत्येकजण अवास्तव लक्षांचा पाठलाग करत आहे. त्यामुळे पुढचा ५०० किंवा ८०० कोटींचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे नावीन्य म्हणजेच सर्जनशिलता नावाच वातावरण राहिलेले नाही.”

अनुराग कश्यप बंगळुरूला स्थलांतरित होत आहात ?

Indian director Anurag Kashyap, known for his bold storytelling, reportedly moving away from Bollywood.

द हिंदूच्या वृत्तानुसार, कश्यप बंगलोरला स्थलांतरित झाले आहेत आणि आता तो दक्षिण भारतात काम करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की दक्षिण चित्रपट अधिक समाधानकारक आणि सर्जनशील आहे. त्यांच्या चित्रपटकडून आपल्याला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पुढे ते म्हणाले की, दक्षिण चित्रपट निर्माते व्यावसायिक दाबावपेक्षा कथाकथानाला जास्त प्राधान्य देतात. याआधी कश्यप यांनी बॉलीवूडबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि म्हटले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा