गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार अनुष्का शर्मा

झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार अनुष्का शर्मा

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा वामिकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलण गोस्वामी हीच्या बायोपिक चित्रपटांमध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सध्या या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये अनुष्का शर्मा सफेद शर्ट ,स्कर्ट , पायात स्लीपर अशा पेहरावत दिसत आहे. हे फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनुष्का शर्माचा फोटो पाहून तिचे चाहते चित्रपटासाठी उत्सुक झालेले दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी वेगवान गोलंदाज झुलना गोस्वामिनी तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे. झुलन गोस्वामिबद्दल सांगायचं तर तिने भारतासाठी जवळपास वीस वर्षे क्रिकेट खेळले आणि वयाच्या ३९ व्या वर्षी निवृत्ती घेतली. तिने आतापर्यंत ३४० आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. झुलन ने वनडे मध्ये २४०, टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये ५६ तर कसोटी क्रिकेट मध्ये ४४ विकेट घेतल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version