लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने गावात चिंतेचे वातावरण नागरिक भयभीत….

इंदापूर, १० ऑगस्ट २०२० : सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरासह राज्यात हाहा:कार माजला आहे इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आता कोरोनाने शिरकाव केला आहे. स्थानिक ग्रामस्थ ,लोणी देवकर ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे आजतागायत कोरोना गावापासून आणि औद्योगिक क्षेत्रापासून दूर होता. परंतु काही कंपन्यांनी आपल्या स्वार्थासाठी अनेकांच्या जीवाशी खेळ चालविला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आखाती देशातील व्यवस्थापन असलेल्या इंदापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये दोन कामगार कोरोना संशयित आढळल्याने त्याची चाचणी केली होती यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे.

याबाबत संबंधित कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता अधिकारी म्हणाले की सध्या गावात सरपंच नाही कोणी प्रशासक असेल तर आम्ही त्यांच्या सोबत बोलू आणि आम्ही आपणास कोणतीही माहिती देऊ शकतात नसल्याचे संबंधित कंपनीतील अधिकाऱ्याने अगदी उर्मटपणे सांगितले. त्यामुळे प्रशासनाचा औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांवर कसलाही धाक नसल्याचे यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

तीन महिन्यांपासून ग्रामस्थांनी कोरोनाला गावापासून दूर ठेवले होते परंतु बाधित कंपनी आणि त्यांच्या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे आज संपूर्ण गाव कोरोनाच्या दहशतीखाली आहे. तसेच संबंधित अधिकारी स्थानिक प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता जुमानत नसल्याचे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कोरोना आणखी वेगाने पसरण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविले आहे तसेच जर कंपन्यांनी असाच उर्मटपणा चालू ठेवला तर कंपन्यांना आम्ही टाळे ठोकू असा देखील सज्जड दम भरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा