गोल पोस्ट आरोग्य चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सबव्हेरियंट; पुण्यात २ रुग्णांची नोंद

चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सबव्हेरियंट; पुण्यात २ रुग्णांची नोंद

महाराष्ट्र २३ जूलै २०२२: देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वेगानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यातल्यात्यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रत ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.५ ची लागन झालेल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे‌.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं माहिती दिली आहे की, दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.५ ची लागन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दोन रुग्णांचे नमुने एन आयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते. दोन्ही रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत.

सध्या व्यावसायिक कारणास्तव पुण्याच्या ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत. आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुबईहून परतल्यानंतर पुणे विमानतळावर नियमित तपासणी दरम्यान या दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं.

सध्या, दोन्ही बाधित रुग्णांमध्ये, कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यानां विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर ते कोरोणामुक्त झाले आहेत. शुक्रवारी राज्यात २५१५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

काल एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण ७८,६७,२८० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्के झालं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version