अन्नासाठी काहीही…

अफगाणिस्तान,३० जानेवारी २०२२ : पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील विदारक सत्य जे समोर आले आहे, ते भयानक आणि भयावह आहे. जिथे अन्न वस्त्र निवारा या महत्वाच्या गरजा मानल्या जातात, तिथे अन्नासाठी मुलांची विक्री होते, ही बाब नक्कीच धोकादायक आहे, असे वृत्त बर्लिन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले. हे वृत्त नक्कीच गंभीरपणे आपल्याला विचार करायला लावणारे आहे. सद्यपरिस्थितीनुसार अफगाणिस्तानमधील अर्धी जनता उपासमारीचा शिकार झाली आहे. काहीजण अन्नासाठी मुलींची विक्री करत आहे तर काहीजण अवयव विक्री करुन गुजराण करत आहेत.

यांचे मुख्य कारण म्हणजे अफगाणिस्तानमध्ये पडलेला दुष्काळ, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तालिबान सत्तेची आलेली हुकूमत हे होय. अफगाणिस्तानमधल्या चार कोटी लोकसंख्येपैकी २.४ कोटी लोकांना अन्न मिंळवताना अडचणी येत आहेत.एका महिन्यात सर्व जनतेला उपासमारीचा सामना करावा लागेल.

आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानला मदत करावी, असं आवाहन केलं आहे. पण याचे नक्की कारण काय, हे शोधण्याचा प्रयत्न केला तर महागाई हे मूळ कारण आहे. सध्या पाकिस्तानात साखर २०० रुपये किलो दराने विकली जाते. तर पेट्रोल २००० रुपयाने विकले जाते. हीच परिस्थिती असल्याने पाकिस्तानप्रमाणे आता अफगणिस्तानात महागाईचा मुळ पसरली आहे. यावर पर्याय शोधणं, हे जागतिक संस्थेचे कार्य असून अफगाणिस्तानमधला संघर्ष त्यांनी लवकर संपवला पाहिजे. तरच अफगाणिस्तान खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा