आपण एकमेकांच्या मयतीला खांदा देणारे आहोत. मग शेतीसाठी रस्ता देण्यासाठीच का बरं संमती नको? शिवाजी डमाळे

अहमदनगर, ८ सप्टेंबर २०२० : भारतीय देशभक्त पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी डमाळे यांनी एका कार्यक्रमात संबोधन करताना सांगितले की, आपल्या मामलेदार कायद्याच्या कलम ५ अन्वये तहसीलदाराला शेतीला रस्ता करून देण्याचे आधिकार आहेत. परंतु तहसीलदारा मार्फत रस्ता मिळाल्यास शेतकऱ्यांचा इगो दुखावला जातो. रस्ता केस, दाखल झाल्यावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होते.

जरी शेतीसाठी रस्ता मिळाला, शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले तरी नाराज झालेले शेतकरी अडथळा निर्माण करू शकतात. आजचे शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञानाने शेती करणारे आहेत. ट्रॅक्टर, टेंपो जाण्यासाठी रस्ता अवश्यक असतोच.

महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना भारतीय देशभक्त पार्टी विचारधारा विनंती पुर्वक सुचविते की, आपण सुशिक्षित ईमानदार युगात आलो आहोत.आपणच आपला निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत.कायदा व नियम आपण चांगल्या प्रकारे जाणतो.आपणच आपल्या शेतीचे शिल्पकार आहोत.तसेच आपणच आपल्या शेजारी शेतकऱ्यांचे जवळचे भाऊबंद आहोत.आपणच एकमेकांच्या मदतीला धावून जाऊ शकतो.त्यापेक्षा महत्वाचा सल्ला म्हणजे,

आपणच एकमेकांच्या मयतीला जाणार आहोत आणि आपणच एकमेकांना खांदा देणार आहोत.

आपणच एकमेकांच्या सुखदुःखात कामी येत असतो. मग आपण जर एवढे एकमेकांना पूरक आहोततर मग रस्त्यासाठीच कशाला तहसीलदार किंवा कायद्याने रस्ता मागण्याची वेळ येऊ द्यायची ?

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा