मुंबई, २७ नोव्हेंबर २०२२ : ‘कांतारा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिनेमागृहात लोकांची गर्दी जमायला लागली. रिलीज होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट हिंदीसह मल्याळम, तेलुगू या भाषांतही डब करून रिलीज करण्यात आला. ऋषभ शेट्टीच्या अभिनयाने आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाने जगभरात या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली. तर अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. ऋषभ शेट्टीच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट २४ नोव्हेंबर पासून ‘ओटीटी’वर पाहता येणार आहे.
अखेर २४ नोव्हेंबरला हा सिनेमा ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झाला; पण यातही एक ट्विट आहे, की ‘कांतारा’ फक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांतच ‘ओटीटी’वर रिलीज झाला आहे. अजून हा चित्रपट हिंदी भाषेत ‘ओटीटी’वर उपलब्ध नाहीय. हिंदीवर कधी येणार, याची घोषणाही अजून केली गेली नाही. हा चित्रपट दक्षिण भारतातील परंपरा ग्रामदैवता आणि तिथल्या आदिवासी लोकांची श्रद्धा यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटात मुख्य भूमिका देखील साकारली आहे.
सर्वप्रथम हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत रिलीज झाला. पहिल्याच दिवशी म्हणजे ३० सप्टेंबरला सिनेमाने १.९८ कोटींचा गल्ला जमवला. कन्नड भाषिक चित्रपटाला प्रतिसाद मिळाल्यानंतर १४ दिवसांनंतर हिंदी, तमिळ, तेलुगू असं भाषांमध्ये चित्रपट डब करून रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन बँक अशी कोटींची कमाई केली तर तेलुगू व व्हर्जन ४२ कोटी कमावले. एकूण मिळून या चित्रपटाने आतापर्यंत ४०० कोटींपर्यंतचा व्यवसाय केला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे