मुंबईमधील एपीएमसी मार्केट तब्बल दहा दिवसानंतर सुरू

मुंबई, दि. २१ मे २०२०: मुंबईमधील एपीएमसी मार्केट तब्बल दहा दिवसानंतर उघडे झाले आहे. मार्केट पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून सुरू करण्यात आले आहे. मार्केट सुरू करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. एपीएमसी मार्केट मध्ये ५०५ कोरोना रुग्ण आढळल्यामुळे हे मार्केट बंद करण्यात आले होते.

तब्बल दहा दिवस हे मार्केट बंद ठेवण्यात आले होते त्यानंतर आज पुन्हा ते सुरू करण्यात आले आहे. मार्केट सुरू करताना विविध गोष्टींची काळजी घेण्यात आली. आवक करण्यासाठी रोज शंभर गाड्यांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खरेदीदार जे आहेत त्यांना देखील १०० च्या संख्येने आत घेण्याचे निर्बंध लादण्यात आले आहेत.

मार्केटमध्ये येणारे व्यापारी, माथाडी, आणि मापाडी यांना पास देण्यात आले आहे. तसेच मार्केटच्या गेटच्या सुरुवातीला निर्जंतुकीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. मार्केट आवारामध्ये आल्यावर मेडिकल कॅम्प लावण्यात आले आहे जेथे सर्वांचे स्क्रिनिंग केले जाते. त्यानंतरच मार्केटमधे सर्वांना प्रवेश दिला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा