Apple ने लॉन्च केलं iOS 16, बदलणार iPhone वापरण्याचा एक्सपिरीयन्स

पुणे, 7 जून 2022: Apple WWDC 2022: iPhone साठी iOS 16 सादर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. iPhone वापरकर्त्यांसाठी iOS 16 मध्ये सर्वात मोठा बदल लॉक स्क्रीनसाठी दिसेल. नवीन अपडेटसह होम स्क्रीनवरील वॉलपेपर बदलण्यापासून ते नोटिफिकेशन Arrangementपर्यंत बदल करण्यात आले आहेत.

iOS 16 मध्ये नवीन स्टाइल नोटिफिकेशन देण्यात आले आहे. कंपनीने त्याला Live Activity असे नाव दिले आहे. याच्या मदतीने वर्कआऊट, लाइव्ह इव्हेंट्स, उबर राईड्स आणि इतर एक्टिविटी करता येतील. लॉक स्क्रीनच्या बॉटमशी नोटिफिकेशन आणल्या गेल्या आहेत.

Apple आता iMessages एडिट करण्यास किंवा रीकॉल करण्यास देखील सुविधा देईल देईल. अॅपलने आपल्या मेसेजिंग अॅपमध्ये तीन प्रमुख वैशिष्ट्ये जोडली आहेत. जर संदेश एसएमएस मजकुराऐवजी iMessage असेल, तर वापरकर्ते ते एडिट करू शकतात किंवा रिकॉल करू शकतात. याशिवाय, ते मजकूर स्नूझ देखील करू शकतात जेणेकरून ते नंतर हाताळता येईल.

टीव्ही शो, संगीत ऐकणे किंवा फिटनेस+ हे शेअरप्लेद्वारे मित्रांसह रिमोटली वापरले जाऊ शकतात. मेसेजेसमधील डिक्टेशन देखील अपडेट केले आहे. याच्या मदतीने ते व्हॉइस आणि टच यांच्यामध्ये सहज मुव्ह करता येते.

Live Text देखील अपडेट केला गेला आहे. ते आता व्हिडीओमध्येही काम करेल. यासह, व्हिडिओला स्टॉप करून टेक्स्ट कॉपी केला जाऊ शकतो. वॉलेट देखील अपडेट केले. याशिवाय, फोटोमधून एखादा आइटम लिफ्ट आउट केला जाऊ शकते. यामध्ये डिजिटल हॉटेल शेअर करण्याचा पर्यायही कंपनी देत ​​आहे.

Contactless पेमेंटसह, मर्चेंट आयफोनवरच पेमेंट स्वीकारू शकतात. Apple Pay Later आणि Split the cost या नवीन प्रकारच्या पेमेंटचा पर्याय देखील Apple Pay मध्ये दिला जाईल. Apple Maps मध्ये अपडेट्स दिसतील. नवीन रीडिझाइन मॅप फ्रान्स, न्यूझीलंडसह 11 देशांमध्ये दिसेल. यामध्ये मल्टीस्टॉप रूटिंगचा पर्यायही दिला जात आहे.

क्रीडा चाहत्यांसाठी, माय स्पोर्ट्सचा पर्याय या अपडेटमध्ये उपलब्ध असेल. यावरून लाईव्ह स्कोअर, फिक्स्चर आणि स्टँडिंग पाहता येईल. फोटो मध्ये देखील अपडेट केले आहेत. यासह, किड्स साठी अकाउंट सहजपणे मॅनेज केले जाऊ शकते. पर्सनल सेफ्टीसाठी एक नवीन टूल, सेफ्टी चेक या अपडेटसोबत दिले जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा