ॲपल चा iPad Pro भारतात लॉन्च

नवी दिल्ली, ऑक्टोंबर २०२२ : ॲपल ने आपले नवीन iPad २०२२ मॉडेल भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. iPadOS १६ वर काम करणाऱ्या ११ इंच आणि १२.९ इंच आकाराच्या दोन वेगवेगळ्या स्क्रीनसह नवीन iPad मॉडेल सादर करण्यात आले आहेत.

फिचर्स

ॲपलने नवीन टॅबमध्ये एम२ प्रोसेसर दिला आहे, जो मॅकबुक एअरमध्येही आहे. यासोबत १६ जीबी पर्यंत युनिफाईड मेमरी देण्यात आली आहे. याशिवाय या टॅबवरून प्रोआरईएस व्हिडीओही रेकॉर्ड करता येतात. दुसरीकडे, १२.९-इंचाच्या मोठ्या मॉडेलमध्ये २०४८x२७३२ पिक्सेल रिझोल्यूशनसह लिक्विड रेटिना XDR मिनी-एलईडी डिस्प्ले आहे.

iPad Pro २०२२ थंडरबोल्ट कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहे. जे ६ के रिझोल्यूशन पर्यंत आहे. यात टाईप-सी पोर्ट आहे आणि वाय-फाय ६E सह ब्लूटूथ ५.३ देखील आहे.

iPad Pro २०२२ मध्ये १२-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड अँगल फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामध्ये ऍपर्चर f/२.४ आहे. त्याच वेळी, मागील बाजूस फक्त १२ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे आणि तो देखील अल्ट्रा वाईड अँगल आहे. दुसरी लेन्स १० मेगापिक्सेलची आहे ज्यामध्ये LiDAR स्कॅनर देखील आहे.

iPad Pro २०२२ २०w सी प्रकारचा चार्जिंग पोर्टसह येतो आणि अडॅप्टर बॉक्समध्ये उपलब्ध असेल. यात चार स्पीकर आणि पाच मायक्रोफोन आहेत. ११-इंच टॅबचे वजन ४८० ग्रॅम आहे, तर १२.९-इंच टॅबचे वजन ६८५ ग्रॅम आहे.

किंमत

११-इंच मॉडेलची किंमत ८१,९०० रुपये (वाय-फाय व्हेरिएंट) आणि ९६,००० रुपये (वाय-फाय + सेल्युलर मॉडेल) आहे. दुसरीकडे, कंपनीने १२.९-इंच वाय-फाय मॉडेलची किंमत १,१२.९०० रुपये निश्चित केली आहे. त्याच वेळी, वाय-फाय सह सेल्युलर मॉडेलची किंमत १,२७,९०० रुपये आहे. iPad Pro मॉडेल्सची प्री-ऑर्डर बुकिंग सुरू झाली असून या डिव्हाइसची विक्री २६ ऑक्टोबरपासून भारतासह अनेक देशांमध्ये सुरू होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा