Apple ने Xiaomi ला टाकले मागे, नंबर-2 स्थान मिळवले, नंबर-1 वर कोण?

पुणे, 2 नोव्हेंबर 2021: अमेरिकन टेक कंपनी Apple ने जागतिक स्मार्टफोन शिपमेंटमध्ये Xiaomi ला मागे टाकले आहे.  पुन्हा एकदा Apple दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.  काही महिन्यांपूर्वीच चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने Appleला दुसऱ्या क्रमांकावरून पछाडत मागे टाकले होते.
 इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या आकडेवारीनुसार, Apple ने तिसऱ्या तिमाहीत 50.4 मिलियन युनिट्सची विक्री केली.  यामुळे कंपनीने Xiaomi ला मागे  टाकत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
 जुलै ते सप्टेंबर अखेर Appleने भरपूर स्मार्टफोन विकले आहेत.  अलीकडेच iPhone 13 सीरीज लाँच करण्यात आली आहे.  जरी iPhone 13 सीरीजची विक्री सध्या भारतात फारशी होत नाही.
 iPhone 13 च्या विक्रीला थोडा उशीर झाला होता आणि अशा परिस्थितीत जुने iPhone खूप विकले गेले आहेत.  विशेषत: Appleसाठी, तिसरी तिमाही चांगली राहिली आणि जी वाढ दिसून आली ती जुन्या iPhoneच्या विक्रीमुळे आहे.
 विशेष म्हणजे, आता Appleचा मार्केट शेअर 15.2% आहे.  कंपनीने यावेळी 20.8% वार्षिक वाढ नोंदवली आहे.  या कालावधीत, चीनी स्मार्टफोन निर्मात्याने स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 4.6% ची घट नोंदवली आहे.
 Xiaomi ने 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत घट नोंदवली असेल, परंतु कंपनीचा बाजारातील हिस्सा अजूनही 13.6% वरच आहे.  Apple दुसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर आता Xiaomi तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
 नंबर-1 बद्दल बोलायचे झाले तर, येथे सॅमसंगने किंगशिप कायम ठेवली आहे.  69 मिलियन जागतिक शिपमेंटसह सॅमसंग हा जगातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड आहे.  या कंपनीचा जागतिक बाजारातील हिस्सा 20.8% आहे.
 स्मार्टफोन ग्लोबल शिपमेंटच्या बाबतीत, चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo चौथ्या क्रमांकावर आहे, तर Oppo पाचव्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही निर्माते एकाच मूळ कंपनीच्या अंतर्गत येतात.  दोन्ही कंपन्यांच्या जागतिक शिपमेंटमध्ये फारसा फरक नाही.
 Vivo बद्दल बोलायचे झाले तर, या कंपनीने 33.3 मिलियन डिव्हाईस विकले आहेत, तर Oppo ने 33.2 मिलियन डिव्हाईस विकले आहेत.  एकूण स्मार्टफोन शिपमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, या तिमाहीत एकूण 331.2 मिलियन स्मार्टफोन विकले गेले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा