ॲपल चीनमधून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत! भारतात सुरू होऊ शकतं या डिव्हाइसचं उत्पादन

पुणे, ८ डिसेंबर २०२२: ॲपल चीनला धक्का देऊ शकते. कंपनीचा भारताला खूप फायदा होऊ शकतो. रिपोर्टनुसार Apple iPhones नंतर आता iPad चं उत्पादन भारतात शिफ्ट केले जाऊ शकतं. संपूर्ण उत्पादन स्थलांतरित केलं जाणार नाही, परंतु कंपनी चीनमधून ३० टक्के उत्पादन काढून टाकू शकते.

सीएनबीसीच्या एका अहवालात याबाबतचा दावा करण्यात आलाय. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की ॲपल आयपॅडचं काही उत्पादन चीनमधून भारतात हलवून नवीन पर्याय शोधू इच्छित आहे. या अहवालात भारत सरकारच्या दोन सूत्रांचा हवाला देण्यात आलाय. मात्र, कंपनीनं अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

भारतात iPhone 14 चं उत्पादन

अलीकडं, Apple ने घोषणा केली की ते चेन्नईतील Foxconn च्या श्रीपेरुम्बुदुर फॅसिलिटी मध्ये नवीन लाँच केलेला iPhone 14 तयार करेल. अधिकृत निवेदनात माहिती देताना कंपनीने म्हटलंय की, ती भारतात iPhone 14 च्या निर्मितीबद्दल खूप उत्साहित आहे.

iPhone 14 Pro चं उत्पादन भारतात देखील शिफ्ट होऊ शकते

कंपनीने पुढे सांगितलं की, नवीन iPhone 14 लाइनअपमध्ये नवीन ग्राउंडब्रेकिंग तंत्रज्ञान देण्यात आलंय. हे सुरक्षा क्षमतेसह येते. फक्त फॉक्सकॉन भारतात आयफोन 14 तयार करत नाही तर अलीकडेच Pegratron ने डिव्हाइस असेंबल करण्यास सुरुवात केलीय.

Apple भारतात आधीच अनेक आयफोन बनवतात. iPhone 12, iPhone 13 आणि iPhone SE भारतात तयार केले जातात. पण, चीनमध्ये कोरोना बंदीमुळं iPhone 14 Pro मॉडेलच्या उत्पादनावर परिणाम होतोय.

रिपोर्टनुसार, चीनच्या झेंगझोऊ येथे असलेल्या फॉक्सकॉन प्लांटमधून २० हजार कामगारांनी राजीनामा दिलाय. येथील कामकाजाच्या स्थितीवर नाराज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, त्याला नंतर हिंसक वळण लागलं. आता या सर्व बाबी पाहता कंपनी उत्पादन स्थलांतरित करण्याचा विचार करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा