पुणे, २१ मे २०२३: ऍपलने २०२२ मध्ये विविध सरकारांच्या आदेशानुसार ऍप स्टोअरमधून १४७४ ऍप्स काढून टाकले, ज्यात चीनमधील १४३५ आणि भारतातील १४ समाविष्ट आहेत. कंपनीच्या २०२२ ऍप स्टोअरच्या अहवालानुसार, पाकिस्तान सरकारने १० ऍप्स काढून टाकण्याची विनंती केली, तर रशियाने कायद्याचे उल्लंघन करणारी सात ऍप्स काढून टाकण्याची विनंती केली
जगभरातील विविध एजन्सींकडून ऍप काढून टाकण्यासाठी एकूण १८,४१२ अपील करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये भारतातील ७०९ अर्ज आले होते. ऍप काढून टाकण्याचे आवाहन केल्यानंतर अॅपलने गेल्या वर्षी भारतात २४ ऍप्स रिस्टोअर केले.
अहवालानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला, ऍपलनेन घोषणा केली की त्यांच्या ऍप स्टोअरने २०२२ मध्ये सुमारे २४०,२३५,४२० फसव्या व्यवहारांना प्रतिबंध केले आहे. जवळपास ३.९ दशलक्ष चोरीचे क्रेडिट कार्ड व्यवहार थांबवले आणि ७,१४,००० खात्यांना पुन्हा व्यवहार करण्यास बंदी घातली गेली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड