कृषी विभागाच्या डी बी टी योजनेचे अर्ज आता एकाच वेबसाईटवर…..

इंदापूर, २६ डिसेंबर २०२०: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या डीबीटी योजनेचे अर्ज एकाच वेबसाइटवर भरता येणार आहेत. आता कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज करताना एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्येक वेळी कागदपत्रे देण्याची गरज नाही.

सातबारा, ८अ राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड क्रमांकासह
mahadbtmahait.gov.in या वेबाईटवर कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज करताना एकदाच नोंदणी करावी लागणार. यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ठिबक/तुषार, मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, शेडनेट हाऊस पॉलिहाऊस मल्चिंग कांदाचाळ प्राथमिक प्रक्रिया केंद्र इ. यासारख्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत असे आवाहन कृषी सहाय्यक प्रशांत मोहोळकर यांनी केले आहे.

तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा