लोणी काळभोर, २२ ऑगस्ट २०२०: कोरोना महामारीमुळे सर्व ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता.
तसेच हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, प्रयगधाम, उरुळी कांचन, शिंदवणे, सोरतापवाडी, तरडे, आळंदी म्हातोबाची, वळती, या ग्रामपंचायतीच्या मुदत दि. २० ऑगस्ट २०२० रोजी अखेर मुदत संपलेली असून या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासक नेमले आहेत.
कोरोना संकटामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजात तात्पुरत्या स्वरूपात या शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. प्रशासक निवडीचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
त्यानुसार दि. २० ऑगस्ट २०२० रोजी अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने नमूद हवेलीचे विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे उरुळीकांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, तरडे, वळती, आळंदी म्हातोबाची, या ग्रामपंचायतीवर एन. के. धापटे, यांची नेमणूक केली असून कोरेगाव मूळ, व शेवाळवाडी, येथे येथे डी. एच. मेत्रे, तर प्रयगधाम येथे ए. एम. बाघुल, थेऊर, लोणी काळभोर, व कुंजीरवाडी, ए. डी. घोगरे, यांची नेमणूक करण्यात आली आहे.
टिळेकर वाडी, व खामगाव, टेक, या ग्रामपंचायत आधीच विभक्त झाल्या त्यावेळी या ग्रामपंचायतीवर ए. एस. बाघुल, व एन. के. धापटे, यांची नेमणूक झाली होती. या नेमणुका मुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पूर्व हवेलीला कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात असून तो कमी करण्याचे आव्हान नवीन प्रशासनापुढे आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे