गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा युवा सेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख पदी मच्छिंद्र सातव यांची नियुक्ती

युवा सेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख पदी मच्छिंद्र सातव यांची नियुक्ती

वाघोली, दि. २३ ऑगस्ट २०२०:वाघोलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र ज्ञानेश्वर सातव यांची शिवसेना युवा सेनेच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर, यांनी नियुक्त्या जाहीर केले असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.

मच्छिंद्र सातव यांची युवा सेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व त्यांच्यावर शिरूर हवेली तालुक्यासह खेड, हडपसर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातव यांनी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन, व राजकीय सामाजिक विषयांमध्ये हिरहिरीने सहभाग घेतला आहे. शिवसेना युवा सेनेचे ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवून एक निष्ठेने काम करणार असल्याचे मच्छिंद्र सातव यांनी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version