प्रवाशांच्या नियोजनाकरीता अधिकाऱ्यांची नियुक्ती : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि.२ मे २०२० : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचने अन्वये, विस्थापित तसेच आदिवासी नागरिकांच्या प्रवासाकरीता आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन कायद्या अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामभाऊ पंदुरे, (मो. ९८५०५४९७४०) यांनी सांगितल्यानुसार, पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये अथवा जिल्हयात जाणा-या आदिवासी नागरिकांना त्या त्या संबधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे, तसेच संबंधित कामगारांची स्क्रिनिंग झाल्याबाबतची खात्री करणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे व त्यांना संबंधित त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याची व्यवस्था करणे, बाहेरच्या राज्यातून/जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या आदिवासी नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे. तसेच संबंधिताना त्यांच्या मूळ राहिवासाच्या ठिकाणी पोहोचते करण्याची व्यवस्था करणे, याकरिता उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, आदिवासी प्रकल्प घोडेगांव जितेंद्र डुड्डी, यांचेशी समन्वय साधुन कार्यवाही करावी. तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A प B (SOP) प्रमाणे कार्यवाही करणेबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा