हवेली: दि. ४ ऑगस्ट २०२० आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी दि.४ रोजी ही माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पुण्यात कोरोनाच्या काळात नवल किशोर राम यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन नागरिकांसाठी उपायोजना केल्या होत्या. कोरोना काळात त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले होते व त्यांनी जिल्ह्यात अनेक मागास ठिकाणी सरकारी योजना पोहचविण्याचे काम ही केले व करत आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून तीन आठवड्याच्या आत पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्ता पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यभारातून कधी मुक्त होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यांच्या बदलीचा आदेश आल्याने नवल किशोर राम यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे










































