इंदापूरच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे शासनाच्या माझी वसुंधरा वेब पेजवर कौतुक

इंदापूर २५ जानेवारी २०२१: महाराष्ट्र शासनाचा माझी वसुंधरा हा उपक्रम सुरू असून या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्य केलेल्या संस्था, पदाधिकारी, अधिकारी यांच्या कामगिरीचे कौतुक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेब पेज च्या माध्यमातून केले जाते.यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दर शनिवारी व रविवारी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या पेजच्या माध्यमातून गुणगौरव केला जातो. या आठवडयाचे मानकरी इंदापूर नगरपरिषद, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल ठरले आहेत.

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इंदापूर नगर परिषदेने शहरात विविध ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड, ई बाइक साठी संप पंप हाऊस लगत मोफत चार्जिंग स्टेशन, शंभर फुटी रोड लगत निर्माण केलेली बायोडायव्हर्सिटी, भार्गवराम बगीच्या भरव्यावर नव्याने ५००० वृक्षांची केलेली लागवड, टाऊन हॉल पाठीमागील बाजूस निर्माण केलेले अटल आनंद घनवन, टेलिफोन ऑफिस ते भारती टॉवर याठिकाणी लावलेले वृक्ष, संविधान चौक ते तापी चौक शंभर फुटी रोड दुतर्फा बाजूस केलेला सायकल ट्रॅक व इतर कामांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पोर्टल वरती महाराष्ट्र राज्यामध्ये या आठवड्यात इंदापूर नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्याची दखल शासनाने घेऊन इंदापूर नगर परिषदेचा सन्मान केला आहे.

इंदापुर शहराची पर्यावरण पुरक वाटचाल सुरू असून लोकसहभागातून ही चळवळ व्यापक झाली आहे. या सन्मानामुळे शहराच्या स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर, हरित इंदापूर संकल्पनेला बळकटी मिळाल्याने नागरिक तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

इंदापूर नगरपरिषद, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यावर या सन्मानामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा