टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना “भारतरत्न” पुरस्कार देण्याचा ठराव मंजूर

पुणे, दि.२ जून २०२०: टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. याशिवाय कोरोनाच्या लढाईत त्यांनी दीड हजार कोटींची मदत केली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालये उभारणीचे काम सुरू आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या उद्योग नगरीत टाटा मोटर्स हा उद्योग समूह सुरू करून अनेक कुटुंबाचा त्यांनी आधार बनण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना “भारतरत्न”पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा ठराव पालिकेच्या महासभेत पारित करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची तहकूब झालेली सभा सोमवारी( दि.१) रोजी पार पडली. या सभेत उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाला सर्वांनी एकमुखाने संमत्ती दर्शवली. शिवाय याबाबत केंद्रकडे शिफारस करण्यात आली असल्याची माहितीही समोर आली आहे.

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे  केला. त्यासाठी टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल १ हजार ५०० कोटींची मदत केली आहे. शिवाय मुंबई येथील हॉटेल ताज विनामोबदला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करुन दिले. शिवाय त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी भरीव अशी मदत केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देशावर ज्या-ज्या वेळी संकटे आली  त्या त्या  वेळेस त्यांनी सर्वतोपरी मदत करत असतात. ज्या ज्या वेळी भारतावर कोणतेही मोठे संकट येते त्यावेळी टाटा हे देशाच्या मागे उभे राहतात. त्यामुळे त्यांचा यात सिंहाचा वाटा आहे.

राज्याने, केंद्र सरकारकडे त्यांची शिफारस केली. तुषार हिंगे यांनी मांडलेल्या उपसूचनेला केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर या ठरावाला सर्वांनी एक मुखाने मंजुरी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा