पुणे : पिकाचा विमा उतरवल्यानंतर आता खरिपातील नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही, त्यामुळे लाखो हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे विमा कंपन्या कशा करणार अशा अवस्थेत सध्या शेतकरी आहेत.
शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. परंतु हा पीकविमा देताना विमा कंपन्या कडे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे.त्यामुळे एवढ्या लाखोंच्या संख्येने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई कशी देणार हाच खरा प्रश्न आहे. त्यासाठी तालुका स्तरावर एक सहायक नेमण्यात आला आहे.परंतु प्रत्येक तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र हजारो हेक्टर असल्याने तो एकटा सहायक काय काय करणार हाच खरा प्रश्न आहे. सर्वेक्षण होणार कसे?
अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच उतरवलेल्या विम्याची रक्कम देण्यासाठी विमा कंपन्यांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही.त्यामुळे रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्याला वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.