अरण केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न

माढा, ३० ऑगस्ट २०२०: माढा तालुक्यातील अरण  येथे ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

विद्यार्थ्यांचे सुरू असलेले शिक्षण कशा प्रकारे सुरु आहे, यामध्ये येणाऱ्या अडचणी पालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी व शनिवारी अरण केंद्रावर शिक्षण परिषद गुगल मॅप द्वारे सकाळी ११:०० ते ०१:००  या वेळेत घेण्यात आली अशी माहिती गट शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये सामावून घ्या असे केंद्रप्रमुख डॉ विलास काळे यांनी सांगितले. केंद्राअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक असे एकूण ६० व्यक्ती या परिषदेला उपस्थित होत्या.

लाँकडॉऊन काळात ऑनलाइन शिक्षण व मुलांच्या शिक्षणाची प्रक्रिया यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गोरख राऊत, जयश्री जाधव, कल्पना घाडगे, दत्तात्रय काळे, उर्मिला बागल, अपर्णा सानप, नवनाथ गेंड आधी मुख्याध्यापक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा