माळीनगर ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

अकलूज (माळीनगर), दि.७ ऑगस्ट २०२०: अकलूज मधील माळीनगर-संग्रामनगर मध्ये दिवाबत्ती व सॅनेटरीपट्टी कर हा २५ रू इतका होता. तो अचानक पणे ३०० रु इतका वाढवण्यात आला आहे. यासंबंधी माळीनगर मधील गावकरी गणेश माने यांनी काल ( दि.६ ऑगस्ट ) ग्रामपंचायत मध्ये विचारणा केली असता, ग्रामपंचायती मधील लोकांनी त्यांना उत्तरे देणं टाळले.

पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती, सॅनेटरीपट्टी, या करांमध्ये अचानक कशी काय वाढ करण्यात आली ? लोकांना विश्वासामध्ये न घेता कर कसा काय वाढवला ? असा प्रश्न गणेश माने यांनी ग्रामपंचायतीमध्ये केला असता, ग्रामपंचायत सदस्यांनी त्यानां कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद यावेळी त्यानीं दिला नाही.

काल सदर घडलेल्या प्रकाराची माहिती गणेश माने यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती पोस्ट केली होती. आज        (दि.७ ऑगस्ट २०२०) गणेश माने यांची आई अंगणवाडी सेविका आहेत त्या आज काही कामानिमित्त अंगणवाडी सेविकांच्या समवेत ग्रामपंचायत ऑफिस मध्ये गेल्या होत्या, तिथे गेल्यानंतर सरपंच साहेबांनी गणेश माने यांचा आईंना मुलाने टाकलेल्या वाढीव कर आकारणी पोस्ट वरून उलट सुलट बोलत आईचा अपमान केला व तुमच्या मुलावर ‘फोजदारी गुन्हा’ दाखल करून देऊ अशी समज यावेळी सरपंच यांनी गणेश माने यांच्या आईंना दिली.

याविषयी न्यूज अनकट प्रतिनिधीने गणेश माने यांना फोनवरून झालेल्या प्रकाराची माहिती विचारताना, ते म्हणाले की ‘आमचा वाढीव कर आकारणीची पावती शेजारच्या घरी ठेवून गेले घरी कोणी नव्हते म्हणून, गेली ३ वर्षे झाली मी स्वतः श्रीहरीनगरमधील तालमीवर एक दिवा लावून द्या. म्हणतोय तरी ग्रामपंचायतीला लावून देणेे झाले नाही आजपर्यंत आणि दिवाबत्ती ३००/-रू केली. सॅनेटरीपट्टी-३००/-रू मला तरी आठवत नाही श्रीहरीनगर मध्ये एकदा तरी सॅनिटरी केलं आहे आरोग्य कर २५/-रू रद्द करून सॅनेटरीपट्टी ३००/- रू केली. सरपंच साहेबांचे म्हणणे आहे की माझी घराची जागाच अधिकृत नाही मग तिथे बल्ब का लावला पाहिजे ? ‘ जर शासनाकडून जनतेला अशी उत्तर मिळत असतील तर जनतेने कोणापुढे आपले प्रश्न उपस्थित करायचे….

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी अयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा