महाविद्यालयांच्या मनमानीला बसला चाप….

पुणे, १८ जुलै २०२० : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून एक रकमी वार्षिक शुल्क आकारू नका असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत.तसेच त्यांना वार्षिक शुल्क भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावेत असे सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत पालक व विद्यार्थी आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत काही संस्था विद्यार्थ्यांकडून एक रकमी शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी संघटनांनी केल्या होत्या. शिवसेनेने अशी मागणी केली होती कि विद्यापीठाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला.कोरोनाचे संकट लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगानेही विद्यार्थ्यांकडून शुल्क घेताना त्यांना पर्याय देण्याचे निर्देश दिले होते.

पालकांच्या स्थितीचा विचार करून एकत्रित शुल्क आकारू नका,असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शुल्काची परिपूर्ती करण्यात येते.

त्या पार्श्‍वभूमीवर ज्या अभ्यासक्रमांच्या शुल्काची परिपूर्ती शासन करते,अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये. तसेच ज्या अभ्यासक्रमाची शुल्काची परिपूर्ती शासनाकडून केली जात नाही,अशा अभ्यासक्रम प्रवेशित विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न घेता पर्याय द्यावेत, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा