उल्हासनगर मधे मित्रांचा वाद, तरूणाचे खांबावर डोके आदळून मृत्यू……

8

उल्हासनगर, ३ फेब्रुवरी २०२१: उल्हासनगर मधे मित्रा मित्रांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. ज्या मधे एका मित्राचे डोके खांबाला आदळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा वाद गांजा पिण्याच्या जागेवरून झाल्याचे समजते आहे. ज्यामुळे उल्हासनगर कॅम्प पाच मधे एकच खळबळ उडाली आहे.

संपुर्ण मित्रांचा समुह उल्हासनगर कॅम्प पाच मधे गांजा ओढत होता. तेव्हा तिथे फहीम शेख हा तरूण आला आणि त्याने त्या समुहाला इथे गांजा पियू नका म्हणून बोलू लागला. त्याच्या अश्या बोलल्याने बाबू (बदलून टाकलेले नाव) हा झो ग्रुपमधे गांजा ओढत होता. तो भडकला आणि त्याला असे का बोलले म्हणून मारू लागला.

बाबू आणि फहीम आधी पासूनच एकमेकांना ओळखत आसल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. तर गांजा पिण्याच्या जागेवरूनच झालेल्या वादात फहीम चा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आणखी एक वेगळी गोष्ट याघटेनच्या मागे आसल्याचे कळत आहे.

उसनावरी ४०० रूपये घेतले होते…..

४०० रूपये उसने घेतलेले पैसे परत मागितल्यावर दोघांमधे वाद झाला आणि बाबू ने फहीम चे डोके खांबावर आदळले. ज्यामधे त्याचा जागीचमृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली असून हा संपूर्ण थरार सीसीटिव्ही मधे कैद झाला. पोलिसांनी आरोपी बाबू च्या वेळीच मुसक्या आवळल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा