सेनाप्रमुख मनोज नरवणे यांनी घेतली जखमी सैनिकांची भेट

लेह, २३ जून २०२० : १५ जून रोजी भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये गलवान खो-यात झालेल्या हिंसक झटापटीत कमांडिंग ऑफिसर (CO) संतोष बाबू सहीत अन्य १९ जवान शहिद झाले तर काही सैनिक या झडपेत जखमी देखील झाले. त्यांना लेह इथल्या सैनिकी इस्पितळात भरती करण्यात आले.

या घटनेनंतर भारताने चीन विरोधात जोरदार मोहिम उघडली त्या धर्तीवर भारत सरकारने सैन्याला कारवाईची खुली सुट दिली . चीनच्या सीमेवर अपाचे, चिनूक, मिराज २०००, यांची टेहाळणी वाढवली . व सैन्य संख्या देखील वाढवली.

या सा-या गोष्टींची पाहणी करण्यासाठी आज सेनाप्रमुख मनोज नरवणे हे लेह येथे दाखल झाले. तत्पुर्वी त्यांनी १५ जूनला चीनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीत जखमी झालेल्या जवानांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली .

सेना प्रमुखांच्या या भेटीमुळे जखमी जवानांचे मनोबल व उत्साह वाढला आहे. असे तेथील एका अधिका-यांनी सांगितले .

न्यूज अनकट

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा