जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदाची डॉ. हर्षवर्धन यांनी स्वीकारली सूत्रे

नवी दिल्ली, दि.२३ मे २०२०: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची २०२०-२१ साठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली.

कार्यकारी मंडळाच्या १४७ व्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. हर्षवर्धन यांनी जपानच्या डॉ. हिरोकी नकतानीची जागा घेतली आहे.त्यामुळे कोरोनाच्या संकटात जग असताना अशा आव्हानात्मक काळात ही जबाबदारी हर्षवर्धन यांच्या खांद्यावर आली आहे.

या पदाचा स्वीकार करण्याअगोदर डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी आपला पदभार हाती घेतला.

यावेळी हर्षवर्धन म्हणाले की, “तुमच्या सर्वांचा विश्वास पाहून मला अभिमान वाटत आहे. हा सन्मान आम्हाला प्राप्त झाला आहे. ही भारत आणि माझ्या सर्वदेशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे”, असे ते म्हणाले.

कोविड सारखी महामारी ही एक मोठी मानवी शोकांतिका आहे. हे मान्य करत आणि पुढील दोन दशके अशी अनेक आव्हाने आपण पाहू शकतो, असे त्यांनी नमूद करत ते म्हणाले की, “या सर्व आव्हानांना एकत्रित प्रतिसाद देणे गरजेचे आहे, कारण हे सर्व सामायिक धोके आहेत. ज्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी संयुक्त जबाबदारी उचलणे आवश्यक आहे.”
तसेच “WHO चा समावेश असलेल्या आमच्या सदस्य राष्ट्रांच्या आघाडीचे हे मूळ तत्वज्ञान असले तरी, त्यास राष्ट्रांच्या सामायिक आदर्शवादाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा