आरोपीला मिळाला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जामीन

बारामती, दि. ३ जून २०२०: बारामतीत पॉस्को कायद्या अंतर्गत व आत्महत्या सारख्या गुन्ह्यातील आरोपीस व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे अँड.धीरज लालबिगे यांनी जामीन मिळून दिला आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता जिल्हा न्यायालयात देखील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरु झाले आहे.

वकील आपल्या कार्यालयात बसून जामीन अर्जाची सुनावणी, रिमांड सुनावणी यासाठी वकील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद करीत आहेत. त्यामुळे सध्या कोरोना सारख्या भयानक संसर्ग असताना देखील न्यायालयाच्या कामासाठी वकील, पक्षकार,त्यांचे नातेवाईक, लेखणीक यांची न्यायालयात गर्दी होते. मात्र आता व्हिडीओ कॉन्फरन्समुळे यांना न्यायालयात येण्याची गरज नाही. परिणामी न्यायालयात गर्दी टाळणे शक्य आहे. गर्दी नसल्याने न्यायालयात देखील सोशल डिस्टन्स पाळला जातो आहे.

गर्दी टाळण्यासाठी व या कोरोना आजारास प्रतिबंध करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न चालू आहेत. अशा या परिस्थितीमध्ये कोर्टात देखील ठराविक कामे केली जात आहे. अति महत्वाच्या कामासाठी कोर्ट काम चालू असते. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्स पाळला जावा यासाठी. प्रत्यक्ष कोर्टात हजर न राहता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काम चालू आहेत. ऑनलइन कामकाजला प्रधान्य दिल जात आहे. कोर्टाचा ‘ई- मेल आयडी’ दिला जातो. त्यावर ऑनलाईन अर्ज करून आपण. व्हिडीओ कॉन्फरन्सने काम करता येते.

अशाच प्रकारे करमाळा पोलिस स्टेशनला पॉस्को आणि आत्महत्या आय पी सी. ३०६ अन्वये गुन्हा दाख़ल झाला. करमाळ्याला बार्शी सेशन कोर्ट आहे. त्यामुळे बार्शी कोर्ट मध्ये बारामतीचे प्रसिद्ध वकील अँड धीरज माणिक लालबिगे यांनी ऑनलाइन अर्ज करून व्हिडीओ कॉन्फरन्सने जामीनाचे काम केले आहे. यामध्ये आरोपीचे वकील अँड. धीरज लालबीगे यांचा युक्ति वाद ग्राह्य धरून बार्शी येथील सन्माननीय न्यायधीशांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला.

यामध्ये अँड. रूपाली माळवदे यानी सहकारी म्हणून काम पाहिले. व्हिडीओ कॉन्फरन्स व ऑनलाइन कामकाजमुळे बारामतीवरून काम करणे शक्य झाल्याचे अँड धीरज लालबिगे तसेच त्यांचे सहकारी अँड. रूपाली माळवदे यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा