गोल पोस्ट गुन्हा विराट कोहलीला अटक करा…., मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल.

विराट कोहलीला अटक करा…., मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल.

मुंबई, ३१ जुलै , २०२० : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करा. अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सध्या विराट कोहली सोशल मीडिया आणि जाहिरातींमध्ये जास्त झळकत आहे. या व्यतिरिक्त तो ऑनलाईन गॅम्बलिंगची म्हणजेच जुगाराची जाहिरात देखील करतोय.

या याचिकेमध्ये दावा करण्यात आला आहे की अशा प्रकारांमुळे जुगाराला प्रोत्साहन दिले जात आहे. ही याचिका चेन्नई मध्ये राहणाऱ्या एका वकिलाने विराट कोहली विरोधात दाखल केली आहे. या बरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना अटक करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

सध्याच्या तरुणांमध्ये अशा अॅपचं व्यसन वाढत चाललंय. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिका कर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. तसेच विराट कोहली आणि तमन्ना भाटिया हे सेलिब्रिटी असून अशा अॅपची जाहिरात करून तरुणांमध्ये दिशाभूल करतायत. त्यामुळे या दोघांना अटक करावी अशी याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे.

या यचिकेमध्ये एका कर्जबाजारी तरुणाचा दाखला दिला आहे. एका तरुणाने या ऑनलाईन अॅपसाठी पैसे उसने घेतले होते. पण तो तरुण ते पैसे परत करू न शकल्यामुळे त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा याचिकेत दाखला देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावर‌ॆ.

error: Content is protected !!
Exit mobile version