प्रसिद्ध निर्माती एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी;

मुंबई , २९ सप्टेंबर २०२२ : बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि आई शोभा कपूर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बिहार न्यायालयाने या दोघींनविरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. यामुळे एकता कपूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका वेब सिरीज मधल्या वादग्रस्त दृश्यांमुळे कोर्टाने एकता कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेबसीरीज मध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पात्राबाबत २०२० मध्ये बेगसूराय न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. एकता कपूरच्या ‘ट्रिपल एक्स’ वेबसीरीजच्या सीझन २ मध्ये सैनिकांच्या पत्नी विषयी आक्षेपार्ह सीन दाखवण्यात आले होते. या मुळे वेब सीरीजच्या निर्मात्यावर विविध जिल्ह्यांमध्ये खटला दाखल करण्यात आला होते. या संदर्भात बेगुसराय मध्येही सेवानिवृत्त सैनिक शंभू कुमार यांनी बेगूसराय कोर्टात खटला दाखल केला होता.या प्रकरणी फेब्रुवारी २०२१ मध्ये एकता आणि शोभा कपूर यांच्याविरुद्ध समन्स जारी करण्यात आले होता. आता न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

या वादाबद्दल एकता कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे.एकताने म्हटले की या दृश्यांमुळे भावना दुखावल्याची माहिती मिळताच तिने या वेब सिरीजमधून ही दृश्य काढून टाकली आहेत. या वादावर एकता कपूरने प्रेक्षकांची माफी देखील मागितली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा