कर्जत.९.जुलै.२०२० : कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे आज सकाळच्या सुमारास बाळूमामा यांची मेंढरं अवतरली आहेत.महाराष्ट्रतील महान योगी संत म्हणून बाळूमामा यांच्याकडे पाहिले जाते. धनगर समाजाचे दैवत, अशी त्यांची ख्याती आहे.
ज्या ठिकाणी बाळूमामा यांची मेंढरे जातात ती जागा रोग मुक्त आणि पवित्र होते अशी भक्तांची श्रध्दा आहे. राक्षसवाडी बुद्रुक परिसरात बाळूमामा यांची मेंढरे येताच तिथल्या नागरिकांनी त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. सध्या कोरोनाचे महासंकट असून देखील बाळूमामाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जो तो आपापल्या परिने मेंढरासाठी चारा, धान्य दान करीत आहे. बोललेला नवस बाळूमामाची मेंढरे पुर्ण करतात, संकटे देखील दुर होतात अशी आस्था, असा विश्वास नागरिकांना असल्याने त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष