परभणी जिल्ह्यात चातक पक्षाचे आगमन

परभणी, दि.१५ जून २०२०: जिंतूर तालुक्यात चातक पक्षाचे पावसाळ्यात आगमन होते. नेहमीप्रमाणे याही वर्षी त्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे पाऊसही लवकरच येणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

आफ्रिका, युरोपातून स्थलांतर करुन पावसाळ्याच्या तोंडावर येऊन संपूर्ण भारतभर विखुरले जातात. चातक आणि पाऊस हे एक समीकरण आहे. चातक हा पक्षी कोकिळेच्या जात कुळातील असल्यामुळे तो ही घरटे बनवत नाही. तो जंगलातील इतर पक्ष्यांच्या घरट्यातील त्यांची अंडी ढकलून खाली पाडून देतो आणि त्या ठिकाणी स्वत:ची अंडी घालतो.

संत वाङमयातील चातक पक्ष्याविषयी येणारे अभंग पाहत असताना आपल्याला संताच्या जीवनातील सर्वच महत्वपूर्ण घटनांची ओळख होते. संत महात्मे जेव्हा ज्ञानप्राप्ती, ध्यान साधनेसाठी जंगलात आपला काही काळ घालवत असे त्यावेळी चातक त्यांना साथ देत असते.

न्युज अनकट प्रतिनिधी :

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा