नांदेड जिल्ह्यात हळदीची आवक ६ मे पर्यंत राहणार बंद

नांदेड, दि.४ मे २०२० : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नवा मोंढा येथील गर्दी कमी करण्यासाठी ६ मे पर्यंत शेतकऱ्यांच्या हळदीची आवक बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आडत्यांशी चर्चा केल्याशिवाय आपली हळद विक्रीसाठी नांदेडला आणू नये, असे आवाहन शेतकरी मित्राचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.

नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात दि. २ मे रोजी उपजिल्हा निबंधक प्रवीण फडणवीस, सभापती संभाजी पुयड यांच्या उपस्थितीत सर्व आडते खरीददार यांची बैठक पार पडली.

यावेळी आडते खरीददार असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, प्रल्हाद इंगोले, कार्याध्यक्ष बद्रीनारायण मंत्री, प्रवीण कासलीवाल, सचिव बालाजी पाटील, शिवाजी पाटील व आडते यांची उपस्थिती होती.

हळदीची आवक ६ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू बाजार समितीच्या आवारात आलेल्या हळदीसह अन्य सर्व शेतमालाचे व्यवहार सुरळीत सुरु राहणार आहेत.
त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल नांदेडला आणण्याची घाई करू नये, ज्यांना माल विकायचा आहे त्यांनी आडत्यांकडे चौकशी करून माल आणावा. असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा