दिल्ली निवडणुकीत पराभव होताच, अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले आम्ही..

८ फेब्रुवारी २०२५ दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवाडीवरून भारतीय जनता पक्षाने जवळपास २७ वर्षानंतर राजधानी दिल्लीमध्ये आपल सरकार स्थापन केल. भाजपने ४७ जागांवर मुसंडी घेत आपलं सरकार स्थापन केल. १२ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या आदमी पक्षाला फक्त २२ जागांपर्यंत मुसंडी घेता आली. त्यामुळे राजधानी दिल्लीत आमआदमी पक्षाला मोठा धक्का बसला.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला. या दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यानंतर आणि आम आदमी पक्षाला आलेल्या अपयशानंतर पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल ?

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. विजयासाठी भाजपाला शुभेच्छा, मला आशा आहे की जनतेने भारतीय जनता पक्षाला ज्या आश्वासनांसाठी मतदान केले आहे ते सर्व भाजप पूर्ण करेल. आमच्या सरकारने आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्रात खूप काम केले आहे. आता आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही, तर आम्ही जनतेमध्ये राहून त्यांची सेवा करू त्याचबरोबर लोकांच्या सुखात आणि दु: खात आम्ही त्यांच्या सोबत राहू आम्ही राजकारणात फक्त सत्तेसाठी आलेलो नाही. अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर