जाहिरातीमार्फत आर्यन खान चे दिग्दर्शनात पदार्पण, शाहरुख खानने केला अभिनय

मुंबई,२५ एप्रिल २०२३:स्ट्रीटवेअर ब्रँडसाठी शाहरुख खानची नवीन जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या जाहिरातीमार्फत त्याचा मुलगा आर्यन खानचे दिग्दर्शनात पदार्पण होत आहे. मर्यादित-रिलीज लक्झरी स्ट्रीटवेअर D’yavol X साठी जाहिरातीमध्ये, आर्यन ब्रँडसाठी एक परिपूर्ण लोगो किंवा टॅगलाइन आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले आहे. तो ‘उत्कृष्ट'(quintessential ) आणि ‘कालातीत'(timeless) सारखे शब्द चिन्हांकित करतो आणि शेवटी लाल रंगाने संपूर्ण ब्लॅकबोर्ड कापतो आणि निराश होऊन निघून जातो. त्यानंतर शाहरुख घटनास्थळी पोहोचतो, पेंटब्रश उचलतो आणि आर्यनने बनवलेल्या तिरकस चिन्हाला क्रॉस चिन्हासारखे दिसण्यासाठी तो कापतो. क्रॉस मार्क हा ब्रँडचा लोगो आहे.
https://www.instagram.com/reel/CraaFa6I53s/?igshid=YmMyMTA2M2Y=

आर्यनने शाहरुखसोबत जाहिरातीत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आर्यन अभिनय करण्यास उत्सुक नसून तो चांगला लेखक असल्याचे शाहरुख खानने यापूर्वीच स्पष्ट केले होते. आर्यनने त्याची पहिली वेब सिरीज लिहिली आहे आणि लवकरच तिचे दिग्दर्शन सुरू होईल. सध्या आर्यन खान देखील अनेक ठिकाणी उपस्थिती दर्शवतो आहे.अलीकडेच, आर्यन, शाहरुख खान आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब एका नवीन कॉफी बुकमध्ये दिसले होते. यात गौरी खान, सुहाना खान आणि अबराम खानसोबत आर्यन शाहरुख खानही होते. त्याचप्रमाणे आर्यन पामेला चोप्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी तो नुकताच यश चोप्रा यांच्या निवासस्थानी गेला होता.

शाहरुख खानची मुलगी सुहाना सध्या ‘द आर्चीज’ या तिच्या डेब्यू चित्रपटाच्या तयारीत आहे. परंतु आर्यनला म्हणजेच शाहरुख खानच्या मोठ्या मुलाला अभिनय क्षेत्रात येण्यास रस नसल्याचे शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते. त्या मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला होता की, “अभिनेता होण्यासाठी जे आवश्यक आहे ते आर्यन कडे नाही आणि त्याला ही हे कळते. पण तो एक चांगला लेखक आहे… मला वाटते की अभिनेता व्हायचे आहे असे आतून आले पाहिजे.”दरम्यान, सुहानाचा नेटफ्लिक्स चित्रपट द आर्चीजची रिलीज डेट अद्याप प्रलंबीत आहे. ही १९६० च्या दशकात रचलेली एक नवीन कथा आहे जी रिव्हरडेलच्या किशोरवयीन मुलांची ओळख करून देईल. यात जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्याही भूमिका आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा