‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ ने केले विविध प्रकल्पांचे उद्घाटन, गरजू शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप

5
पुणे, २७ मार्च २०२१: ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ ने आज आपल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. कंपनीने आज २७ मार्च रोजी भव्य स्वरूपात उद्घाटन समारंभ करण्याचे आयोजित केले होते. मात्र, वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारच्या नवीन गाईड लाईनचे पालन करत कंपनीने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत आपला कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पाडला. कंपनी अनेक क्षेत्रांमध्ये आपले काम करत आहे. या आपल्या विविध प्रकल्पांमधून कंपनी तब्बल १,८०० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार आहे. इतकेच नव्हे तर यानिमित्ताने कंपनीकडून अनेक सामाजिक कार्य देखील केले गेले आहेत.
गरजू शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप
कंपनी राज्यातील विविध भागातील निवडक गरजू शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे कंपनी रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत आहे. भारत सरकार रिन्युएबल एनर्जी वर लक्ष केंद्रित करत आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञानाने सक्षम करण्यासाठी राज्यातील २५ शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वाटप कंपनीकडून करण्यात येणार आहे. आज त्यातील दोन शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यांची नावे लक्ष्मीबाई साळुंखे (मु. पो. अंजन डोह, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर), खंडू सुखदेव दनाने (मधुकर नगर पाटस, तालुका दौंड जिल्हा पुणे) अशी आहेत.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सी ई ओ श्री. मनोहर जगताप, आर्यन्स ग्रुप चे सदस्य श्री.जोसवा, श्री. विपुल बंसल- पी. एस. (प्रायव्हेट सेक्रेटरी) फायनान्स मिनिस्टर, श्री. बिंदू कुमार- पी. एस. मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टरी, श्री. डॉ. अजयभूषण प्रसाद पांडे- फायनान्स सेक्रेटरी, श्री. विवेक कुमार, पी. एस. टू पीएमओ (प्रधानमंत्री कार्यालय), श्री. प्रतिक दोशी- ओएसडी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंट पीएमओ, श्री. डॉ. राजीव कुमार- व्हाईस चेअरमन निती आयोग, श्री. अनुप वादुवा- सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. विवेक कुमार देवगन- ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ पॉवर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा