‘सोनेरी पहाट, गुढीचा थाट’ ‘आनंदाची उधळण, सुखाची बरसात’
२ एप्रिल, गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नववर्षाची सुरुवात, या निमित्ताने आर्यन्स ग्रुप वाहतूक क्षेत्रात पदार्पण करत आहे. आर्यन्स ग्रुपचे सीईओ/सीएफओ मनोहर जगताप हे राज्य सरकारी कर्मचा-यांना गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर १०० ई-वाहने भेट म्हणुन दिले. या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. .यावेळी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् चे CEO मनोहर जगताप यांनी ई बाईक्सची चावी त्यांना देत या बद्दल चे कार्य कसे केले या बद्दल माहिती दिली, हा सोहळा पर्यावरण पूरक इंधन , ई-वाहने आणि संबंधित साधनसामुग्रीच्या पुण्यात प्रथमच सुरु होत असलेल्या प्रदर्शनात साजरा करणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेने उचललेले आर्यन्स ग्रुपचे हे पाऊल महत्त्वाचे म्हणावे लागेल.
आर्यन्स ग्रुपने आता ई- वाहन क्षेत्रात पदार्पण केले असून ई-दुचाकी बरोबरच, चार चाकी दुचाकीच्या निर्मितीचे कामही आर्यन्स ग्रुप करत आहे. त्याचबरोबर ई-वाहनांसाठी आवश्यक असलेल्या हायड्रोजन बॅटरीज, सोडियम बॅटरीजच्या निर्मिती आर्यन्स ग्रुप करत आहे.ई-क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या लिथियम बॅटरीजच्या निर्मितीवरदेखील आर्यन्स ग्रुप भर देणार आहे. या निमित्ताने आर्यन्स ग्रूप भारताच्या वाहतूक क्षेत्राचा महत्त्वाचा भाग होणार असून जास्तीत जास्त प्रमाणात पर्यावरण पूरक गोष्टींच्या निर्मितीमध्ये आमचा सहभाग असल्याचं आर्यन्स ग्रूपचे सीईओ/ सीएफओ मनोहर जगताप यांनी सांगितलं.
दिवसेंदिवस इंधनाची होणारी दरवाढ आणि त्यामुळे सर्वसामांन्यांना बसणारी झळ यावर ई-वाहने हा उत्तम पर्याय असून पर्यावरणाला सुरक्षित राखण्याचा उद्देश यामुळे साध्य होणार आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचार्यांनाच नाही तर केंद्राला देखील येणाऱ्या काळात या ई-वाहने देणार आहेत.प्रगतीच्या आणि पर्यावरण बचतीच्या दृष्टीने आर्यन्स ग्रूपचे हे मोलाचे आणि महत्त्वाचे कार्य म्हणावे लागले.
न्युज अनकट प्रतिनिधी