आद्वी’च्या रुपात ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज उतरणार वस्त्रोद्योग प्रकल्पात

27
Aryans Group of Companies to enter textile industry project under the name of 'Advi'
‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज उतरणार वस्त्रोद्योग प्रकल्पात

Aaryan Group of Companies new project: ‘आद्वी’ ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवी कंपनी स्थापन करत ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी’नं वस्त्रोद्योग निर्मितीत दिमाखात पदार्पण केलं आहे. काल बावधन येथील कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आद्वी’ या वस्त्राद्योग कंपनीच्या लोगोचं आणि विविध डिझायनर ड्रेसचं आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता जगताप यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले.

यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता जगताप यांनी उपस्थित मान्यवरांना माहिती दिली की, हा माझा स्वप्नवत प्रकल्प असून आम्ही २०१६ पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली होती. याशिवाय यामध्ये भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे.

“सध्या हे ड्रेस ऑनलाइन उपलब्ध होणार असून पुण्यात लवकरच याचं शॉप सुरू होणार आहे. अशी माहिती मनोहर जगताप यांनी दिली. आद्वीच्या माध्यमातून महिलांबरोबरच पुरुषांच्यादेखील विविध
मालिका बाजारात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं.पुढे ते म्हणाले की, गुढीपाडव्याला आणखी काही वस्त्रप्रावरणांच्या मालिका सादर केल्या जाणार आहेत.

यावेळी कंपनीचे अध्यक्ष मुकुंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, अजय जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा