‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ करणार नवीन उद्योजकांना आर्थिक साहाय्य

पुणे, १३ मार्च २०२१; देशात सर्व काही सुरळीत चालू होते.आणि एक दिवस सर्वसामान्यांच्या आयुष्याला कोरोना नावाचे ग्रहण लागले.कोरोना ने देशातच नाही तर संपूर्ण जगभर थैमान घातले.हा हा म्हणता अनेक क्षेत्रांना यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला.अनेक होतकरू तरुणांचे तसेच उद्योजकांची मेहनत,स्वप्न भंगले.आणि याच तरुणांचा व उद्योजकांचा विचार करत “आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्” नवीन योजना आणली आहे.

“आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्”गेल्या अनेक दिवसांपासून विविध क्षेत्रातील गरजू,गरीब,होतकरू अश्या अनेक घटकांना मदत करत आहे.तसेच समाजातील विविध गरजा पुर्ण करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करत आहे.ज्यामुळे विविध क्षेत्रातील माध्यमांना मदत होत असून डिजिटल प्रबोधन देखील होणार आहे.

स्टार्टअप इंडिया या योजनेला धरुन नवीन उद्योजकांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी,आपल्या ध्येय आणि स्वप्नपुर्तीसाठी,संयुक्त रित्या ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’च्या वतीने मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे.ज्यामुळे अनेक उद्योजकांना नवीन दिशा मिळणार असून बेरोजगार हातांना काम कामे मिळतील.

“आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्” सतत विविध क्षेत्रात आपले योगदान देत कर्तव्य बजावत आसल्याचे निदर्शनास येते आहे.आता या नवीन उद्योजकांना संधी देऊन वेगवेगळे उपक्रम राबवून विविध क्षेत्रात नवी उंची गाठण्यास कंपनी अग्रेसर राहणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; निखिल जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा