जोपर्यंत मराठा आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील – खा. संभाजीराजे भोसले 

मुंबई, २१ सप्टेंबर २०२०: सर्वोच्च न्यायालयानं मराठा मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज दुखावला गेला. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. मराठा समाजानं सरकारवर सरकारला धारेवर धरत आरक्षणाची मागणी केली. खासदार संभाजीराजे भोसले यांनीही मराठा समाजाची बाजू मांडत सरकारला चांगलंच सुनावलं होतं.

मराठा आरक्षणाचा विषय हा सध्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी आणि आरक्षण टिकवण्यासाठी सरकार सर्वोतरी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेकदा स्प्ष्ट केलंय. त्यामुळे सरकार जर आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर, आम्ही त्यांना नक्की सहकार्य करू असं वक्तव्य करत खासदार संभाजीराजे भोसलेंनी राज्य सरकारबाबत सकारात्मकता दाखवली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये संभाजीराजे भोसले म्हणाले कि, राज्य सरकारने नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशावर न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवण्यासाठी विनंती अर्ज केल्याचे समजते. आरक्षण टिकवण्यासाठी सरकार जर प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर, आम्ही त्यांना नक्की सहकार्य करू.
आंदोलनाची दिशा ठरलेली आहेच. कोरोना काळातही समाजाने जी एकी दाखवली त्यामुळे सरकार वर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार सध्यातरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मी स्वतः कोर्टात सुरू असलेल्या लढ्यावर जातीने लक्ष ठेऊन असतो. वेळोवेळी सरकार ला याबाबत सूचना सुद्धा देत आलो आहे. यापुढे शासन अधिक गांभीर्याने प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे.

मराठा आरक्षण हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. गेल्या दीड दशकांपासून मराठा समाजाला न्याय मिळावा, आणि समाजाने मतभेद विसरून तो एका छताखाली यावा यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील.

दरम्यान राज्य सरकार पोलीस दलात मेगाभरती करणार आहे अशी माहिती समोर आली होती. तेव्हा मात्र संभाजीराजेंनी या पोलीस भरतीला कडाडून विरोध केला होता. कारण मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं या पोलीस भरतीचा लाभ मराठा समाजाला होणार नाही त्यामुळे पोलीस भरती मराठा आरक्षण देऊनच करावी अन्यथा रद्द करावी अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसलेंनी केली होती. सध्या मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असून राज्यात काही ठिकाणी आंदोलनही झाली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा