गणेशोत्सव संपताच राज ठाकरे मैदानात उतरणार….

मुंबई, ४ सप्टेंबर २०२२: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर एक ठाकरे राजकारणातून बाहेर फेकले गेले तर दुसरे ठाकरे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. उद्धव ठाकरे पक्ष वाचवण्यात व्यस्त आहेत तर राज ठाकरे मात्र राज्यातल्या अस्थिर राजकीय परीस्थितीकडे संधी म्हणून बघत आहेत. राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत त्यासाठी राज ठाकरेंनी निर्णय घेतला आहे.

शिवसेनेत फूट पडली आहे. काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी राज ठाकरेंनी भाजपच्या साथीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याची योजना आखली आहे. राज ठाकरे यांनी गणेशोस्तव संपताच संघ आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्याचे निश्चित केले आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना या बदललेल्या परिस्थितीकडे संधी म्हणून बघताना महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा