शिंदे यांनी शिवसेनेची कमान हाती घेताच सत्ताकेंद्र मुंबईहून ठाण्यात हलविले; मुख्यमंत्र्यांचे गुरूगृह झाले कार्यालय

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२३ : इंग्रजीत एक म्हण आहे- ‘The maxim that actions speak louder than words.’ (शब्दांपेक्षा क्रिया मोठ्याने बोलतात.) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची कमान एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर आता नवनवीन बदल ऐकायला मिळत आहेत. शिवसेनेचे कार्यालय बदलले आहे. आता ते मुंबईहून ठाण्यात स्थलांतरित झाले आहे. म्हणजेच आता शिवसेनेचे सर्व आदेश व फर्मान उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री बंगल्यातून किंवा दादर येथील शिवसेना भवनातून दिले जाणार नाहीत. आता ठाण्यातील आनंद आश्रमातून शिवसेनेचे सर्व कामकाज चालविले जाणार आहे. आनंद आश्रम हे दिवंगत आनंद दिघे यांचे कार्यस्थळ आहे.

आनंद दिघे असे त्या गुरूचे नाव आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांना सूर्य बनविले. आनंद दिघे हे तेच व्यक्तिमत्त्व ज्यांनी ऑटोचालकाचे महत्त्व ओळखून त्यांना आपले शिष्य बनविले. आज तोच ऑटोचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. शिष्यानेही गुरूंना मान दिला असून, गुरूंचे कार्यस्थान हेच शिवसेनेचे नवीन सत्ताकेंद्र बनले आहे.

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे उभी राहिली, तर शिवसेना आपल्या कट्टर कार्यकर्त्यांमुळे वाढली. अशा स्थितीत कार्यकर्त्यांचा सल्ला न घेता आणि नेत्यांच्या भावनेला जागा न देता उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय कसा घेणार? मुंबईतून ठाणे हे शिवसेनेचे सत्ताकेंद्र बनविण्याची ही कृती बरेच काही सांगून जाते.

बाळासाहेबांचे विचार हीच आपली मालमत्ता असल्याचे एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केले. दादर येथील शिवसेनेच्या इमारतीसह ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेचा त्यांना कोणताही लोभ नाही. अशा परिस्थितीत आजवर दादर येथील शिवसेना भवनातून ज्या नियुक्त्या, परिपत्रके आणि आदेश निघत होते, ते आता ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमातून निघू लागले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा