गोल पोस्ट महाराष्ट्र मुलीचे आजारपण असाह्य झाल्याने बापाने चिमुकलीचा गळा दाबून संपवले जीवन

मुलीचे आजारपण असाह्य झाल्याने बापाने चिमुकलीचा गळा दाबून संपवले जीवन

बीड,दि. १६ मे २०२०: बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका केज येथून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली. वडवणी गावात असलेल्या फुल विक्रेत्याची सहा वर्षांची मुलगी सोमवारी सात वाजल्यापासून बेपत्ता होती. कुटुंबाने आसपासच्या परिसरात शोधाशोध केली, मात्र मुलगी कुठेच न सापडल्याने सर्व जण चिंतेत होते. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास चिमुरडीचा मृतदेह गावाशेजारील वाड्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली.

मृतदेह मिळाल्यानंतरही वडिलांच्या चेहऱ्यावर कसलेच दुःख न दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे नंतर पोलिसांनी बापाची कसून चौकशी केली. पोलीसांनी केलेल्या या चौकशी मध्ये अखेर त्याने सत्य सर्वांसमोर आणले.

मुलगी सतत आजारी असायची. तिचे आजारपण असाह्य झाल्याने टोकाचे पाऊल उचलून स्वतःच्या पोटच्या पोरीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. चिमुकलीच्या हत्येप्रकरणी पोलीसांनी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version