“अग्गबाई सासूबाई” मालिकेतील आसावरीच्या सासर्याचं निधन……

मुंबई, ६ डिसेंबर २०२०: मराठी सिने नाट्य सृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. जेष्ठ आभिनेते रवी पटवर्धन यांनी ठाण्यातील राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. भारदस्त व्यक्तीमत्व त्यांना शोभतील अश्या झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळं त्यांनी ‘पोलीस आयुक्त’, न्यायाधीश आणि खलनायकी भूमिका साकारल्या आहेत.

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळं त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. रवी पटवर्धन यांनी १९७४ मध्ये आरण्यक हे नाटक केलं. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली.

नुकतीच झी वर सुरू आसलेली प्रसिद्ध मालिका अग्गबाई सासूबाई यामधे त्यांनी निवेदिता सराफच्या सासर्यांचा रोल केला होता. ज्या मुळं ते महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक खडूस बाप म्हणून ओळखले गेले. खरं तर त्यांच्या आभिनयाची पोहचपावती होती. रवी पटवर्धन यांनी आईची सेवा करता यावी यासाठी लग्न केलं नाही.

• रवी पटवर्धन यांच्या प्रसिद्ध मालिका

अग्गबाई सासूबाई झी मराठी मालिका

आमची माती आमची माणसं (शेतकऱ्यांसाठीचा दैनिक मराठी कार्यक्रम)

तेरा पन्‍ने

महाश्वेता

लाल गुलाबाची भेट

• रवी पटवर्धन यांची काही गाजलेली नाटकं

अपराध मीच केला

आनंद (बाबू मोशाय)

आरण्यक (धृतराष्ट्र)

एकच प्याला (सुधाकर)

कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान)

कोंडी (मेयर)

जबरदस्त (पोलीस कमिशनर)

प्रेमकहाणी (मुकुंदा)

बेकेट (बेकेट)

भाऊबंदकी

मला काही सांगायचंय (बाप्पाजी)

मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस)

विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर)

• रवी पटवर्धन यांचे चित्रपट

अंकुश (हिंदी)

अशा असाव्या सुना

उंबरठा

दयानिधी संत भगवान बाबा

ज्योतिबा फुले

झॉंझर (हिंदी)

तक्षक (हिंदी)

तेजाब (हिंदी)

नरसिंह (हिंदी)

प्रतिघात (हिंदी)

बिनकामाचा नवरा

सिंहासन

हमला (हिंदी)

हरी ओम विठ्ठला

रवी पटवर्धन यांच्या निधनाने बाॅलिवूड सह मराठी नाट्य सृष्टीवर शोककळा पसरली आसून अनेक दिग्गज कलाकारांनी यावर हळहळ व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा