असेंड स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा

30

पुरंदर : दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती राज्यभरात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील असेंड स्कुलमध्ये ही आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
नीरा नजीक थोपटेवाडी(ता.पुरंदर) येथील असेंड  इंग्लिश मिडीयम  स्कूल मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
६ जानेवारी १८२५ साली पहीले मराठी वृत्तपत्रत सुरू करणारे जांभेकर यांची जयंती राज्य शासनाच्या वतीने मराठी पत्रकार दिन  म्हणून साजरी केली जाते. असेंड स्कूल मध्ये आज स्थानिक पत्रकारांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जेष्ठ  पत्रकार बाबासाहेब ननवरे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाअध्यक्ष राहुल शिंदे, भरत निगडे, रामदास राऊत, श्रद्धा जोशी या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी  संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ खोमणे, उपाध्यक्ष सुदर्शन जैन, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, उपमुख्याध्यापीका सुषमा मुंडे, संचालीक तनुजा शहा, नेहा शहा, विठ्ठल झगडे, स्वप्निल पवार, सुनिता पवार स्कुल मधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी  विद्यार्थ्यांनी पत्रकारांनी भुमिका घेत पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या. नेहमी थोरा मोठ्याच्या मुलाखत घेणाऱ्या पत्रकारची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याने  विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर ‘का’ व ‘एनआरसी’ या कायद्या संदर्भात चर्चा सत्र यावेळी आयोजित करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी या कायद्याची  दिलेल्या माहिती मुळे विद्यार्थ्यी व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा